Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र पेट्रोल दरवाढीबद्दल अजित पवारांचे मोठे वक्तव्य…

पेट्रोल दरवाढीबद्दल अजित पवारांचे मोठे वक्तव्य…

17

पुणे : इंधनावरील करकपात करण्यास राज्य सरकार असमर्थ असून केंद्र सरकारनेच पेट्रोलियम उत्पादनांवरचे कर कमी करावेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार [ deputy chief minister ajit pawar ]  यांनी म्हटले आहे. ते पुण्यात कोविड आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारने आपल्या काळात कोणतेही कर वाढवले नसून, कोविड काळात शासनाचे उत्पन्न अंदाजे सव्वा लाख कोटी रुपयांनी कमी झाले असून, खर्च वाढला आहे. त्यामुळे इंधन दराच्या बाबतीत राज्यशासन काही करू शकत नसल्याचे, पवार यांनी नमूद केले. कोविड लसीचा पुरवठा ज्या प्रमाणात होईल, त्यानुसार लसीकरण केले जाईल. पर्यटन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा, व्हीएमव्हीच्या शताब्दीनिमित्त १०० कोटींचा प्रस्ताव