‘या’ कारणांमुळे केंद्रीय मंत्री अडकले नवी दिल्लीत

राष्ट्रीय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जणांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मात्र, हा आनंद साजरा करण्यासाठी मतदारसंघात जाण्याची संधी देण्यात आलेली नाही. आगामी स्वातंत्र्यदिनापर्यंत राजधानी न सोडण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्वांना मार्गदर्शन केले होते. यात त्यांना पुढील सूचनेपर्यंत दिल्ली न सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छा असूनही अनेक मंत्री मतदारसंघात जाऊ शकत नाहीत. अनेकदा मंत्री शनिवार-रविवारीआपल्या मतदारसंघात जात असतात. अगदी संसदेचे अधिवेशन सुरू असले तरी अनेक मंत्री, खासदारांचे हेच वेळापत्रक असते; परंतु मोदींनी दिलेल्या आदेशानंतर या मंत्र्यांचे सध्या मतदारसंघाकडे पाऊल टाकण्याचे धाडस होत नसल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *