Home राजधानी मुंबई NEET : परीक्षा यंदा 12 सप्टेंबरला होणार

NEET : परीक्षा यंदा 12 सप्टेंबरला होणार

85

मुंबई : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट -2021 परीक्षा यंदा 12 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.

देशातील कोरोनाची स्थिती पाहता परीक्षा आयोजन करण्यात येणाºया परीक्षा केंद्र्राच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा देशभरातील 198 शहरांतील 3 हजार 862 केंद्र्रावर होणार आहे. कोरोना महामारीसंबंधी नियम पाळून परीक्षेचे आयोजन केली जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.