Home राजधानी मुंबई रेसीपी बनवा, ‘मास्टरशेफ आॅफ महाराष्ट्र’ बना आणि जिंका बक्षीस

रेसीपी बनवा, ‘मास्टरशेफ आॅफ महाराष्ट्र’ बना आणि जिंका बक्षीस

151
file photo

मुंबई : राज्याच्या पर्यटन संचालनालयाने [ maharashtratourism ] ‘मास्टरशेफ आॅफ महाराष्ट्र’ या आॅनलाईन पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

राज्यातील खाद्यसंस्कृती आणि अन्न शिजवण्याच्या विविध पद्धतींना चालना देणे, देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत विविध वर्गवारीत एकूण १४५ सर्वोत्कृष्ट पाककृती निवडल्या जातील. त्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम दिली जाईल. याशिवाय स्पर्धेत भाग घेणाºयांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन संचालक धनंजय सावळकर यांनी दिली आहे.

स्पर्धेत सहभागासाठी आपल्या आवडत्या महाराष्ट्रीय डिशची व्हिडिओ रेसीपी ऑनलाईन सबमिट करावयाची आहे. 11 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा असेल. व्हिडिओ किमान 30 सेकंद आणि कमाल 15 मिनिटांचा असणे आवश्यक आहे. व्हिडिओचा आकार 100 एमबीपर्यंत असावा. व्हिडीओ रेसीपीसह त्यातील घटक आणि पद्धतीची माहिती लिखीत स्वरुपातही सोबत सादर करणे आवश्यक आहे. अभिनव शूटिंग शैली, अन्नाचे सादरीकरण, प्रादेशिक महाराष्ट्रीय रेसीपी, महाराष्ट्रीय पदार्थांचा वापर, अन्नपदार्थ स्वच्छ, आरोग्यदायी ठेवण्यासाठी काळजी आदी बाबींच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल. मजकूर, संभाषण किंवा व्हॉईस-ओव्हर हा मराठी किंवा इंग्रजी भाषेत वापरला जाऊ शकतो. व्हिडिओंना कोणताही वॉटरमार्क नसावा, असे व्हिडिओ अपात्र ठरविले जातील. तज्ज्ञ शेफ्सच्या समितीमार्फत विजेत्यांची निवड केली जाईल.

स्पर्धेविषयीची माहिती www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.