Home राजधानी मुंबई माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

12

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा [ cricketer yashpal sharma ] यांचे आज मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

माहितीनुसार, आज सकाळी फिरावयास गेले होते. परत आल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7.40 वाजता त्यांचे निधन झाले.

यशपाल शर्मा यांनी आपल्या कारकिर्दित अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्या असून,1983च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे यशपाल शर्मा हे सदस्य होते. 37 कसोटी सामन्यांमध्ये ते भारताकडून खेळले. यामध्ये 34 च्या सरासरीने 1 हजार 606 , तर 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 883 धावा केल्या होत्या. 1980च्या सुमारास शर्मा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होते. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी 89 धावांची खेळी केली होती. तर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 61 धावा काढल्या होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट निवड समिती सदस्य आणि समालोचकाची जबाबदारी पार पाडली होती. दरम्यान, त्यांच्या निधनावर अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

ईएसबीसी प्रवर्गातील नियुक्त्या कायम राहणार, राज्य शासनाचा निर्णय जारी
रेसीपी बनवा, ‘मास्टरशेफ आॅफ महाराष्ट्र’ बना आणि जिंका बक्षीस