Home राष्ट्रीय विजेच्या कडकडाटात ‘मोबाईल सेल्फी’ ठरली मृत्यू

विजेच्या कडकडाटात ‘मोबाईल सेल्फी’ ठरली मृत्यू

37

SKY LIGHTING : राजस्थान आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानात जयपूरमध्ये आमेर महलाच्या [ AAMER MAHAL ] टॉवरवर वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशात चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाद आणि कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून 30 जण मृत्युमुखी पडले.

वृत्तसंस्थानुसार, राजस्थानात मुसळधार पाऊस सुरू असताना अनेक जण सेल्फीसाठी आमेर महालाच्या टॉवरवर चढले होते. यावेळी टॉवरवर वीज कोसळली आणि सेल्फी काढणारे लोक विजेच्या जोरदार धक्क्याने आजूबाजूच्या जंगलात उडाले. यात तरुणांचा आकडा अधिक होता. काहीजण टॉवरवर तर काहीजण डोंगरावर चढले होते. यात टॉवरवर वीज कोसळली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दुर्दैवी घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना प्रकट केल्या.