Home राजधानी मुंबई दहावी निकालात मुलींनीच बाजी, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर

दहावी निकालात मुलींनीच बाजी, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर

74

SSC EXAM RESULT 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 75 हजार 806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95 आहे. दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे.  दहावीच्या निकालात 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. विशेष म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे.