पशुसंवर्धन क्षेत्रासाठी विशेष मदत योजनेची अंमलबजावणी : अनुराग ठाकूर

राष्ट्रीय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार विषयक समितीनं २०२१-२२ पासून सुरू होणाऱ्या वर्षापासूनच्या पुढील पाच वर्षात पशुसंवर्धन क्षेत्रासाठी विशेष मदत योजनेची अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली आहे,असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर [ I-M MINISTER ANURAG THAKOOR ] यांनी नवी दिल्लीत सांगितले.

केंद्र सरकारच्या विविध योजनांमधील काही तरतुदींमध्ये सुधारणा आणि फेररचना करण्याचा यामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे पशुसंवर्धन क्षेत्राला आणखी चालना मिळून पशुधन बाळगणाऱ्या जवळपास १० कोटी शेतकऱ्यांच्याही उत्पन्नात वाढ होईल.

या योजनेसाठी केंद्र सरकार पाच वर्षात ९ हजार ८०० कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ देणार आहे. या निधीसह या योजनेच्या पाच वर्षांच्या कालावधीत एकंदर ५४ हजार ६१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सर्व योजनांचे एकत्रीकरण करून त्यांची मुख्य तीन गटात वर्गवारी करून विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *