Home राष्ट्रीय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत ५ महिन्यांसाठी वाढवली

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत ५ महिन्यांसाठी वाढवली

11

NATIONAL CAPITAL : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याची योजना राबवली आहे आणि या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत आता आणखी ५ महिन्यांसाठी म्हणजे जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेच्या चौथ्या टप्प्यात ३१ राज्यांनी १२ जुलैपर्यंत १५ पूर्णांक ३० लाख मेट्रिक टन अन्नधान्य घेतले आहे.

या योजनेसाठी भारतीय खाद्य महामंडळाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरेसा साठा ठेवला आहे. सध्या, ५८३ लाख मेट्रिक टन गहू आणि २९८ लाख मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध आहे. याआधी मे ते जून या कालावधीत सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ७८ लाख मेट्रिक टनांहून अधिक अन्नधान्य पुरवण्यात आले आहे.