Home राजधानी मुंबई मुख्यमंत्री म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तातडीने थांबवा

मुख्यमंत्री म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तातडीने थांबवा

32

MUMBAI CAPITAL : आपण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केला. अजून दुसरी लाट ओसरली नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ती अजूनही साडे आठ हजार ते ९ हजारावर स्थिरावली आहे, अजूनही ती त्या खाली जातांना दिसत नाही, उलट काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे ही चिंतेची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतील  आपल्याला हा जो मधला काळ मिळाला आहे त्यात तिसरी लाट येऊच नये यासाठी किंवा दुर्देवाने आलीच तर त्याची तीव्रता कमी राहील यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोना आरटीपीसीआर चाचण्या वाढवा, पर्यटनस्थळी होणारी गर्दी तातडीने थांबवा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या, ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करून त्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा, गाव, वाड्या वस्तींवर लक्ष केंद्रीत करा, कोरोनामुक्त गाव संकल्पनेत चांगले काम होईल यादृष्टीने प्रयत्न करा, कोरोना विषाणूमध्ये बदल दिसत असेल तर जिनोम सिकवेन्सी करून घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

महाराष्ट्र पोलिस दल सर्वोत्तम, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत ५ महिन्यांसाठी वाढवली