कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना आरटीपीसीआर चाचणीतून सूट

राजधानी मुंबई

MUMBAI CAPITAL : ज्या व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 15 दिवसांचा अवधी उलटला असेल, अशा व्यक्तींनी राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज नाही.

मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेलं अधिकृत प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.

देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड प्रतिबंधक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ 48 तासांवरून वाढवून 72 तास इतका करण्यात आल्याचंही एका प्रसिद्धी पत्रकामार्फत कळवण्यात आले आहे.

 

अंथरुणाला खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा
जाणून घेऊ या. झिकाः आजार, लक्षणे व उपचार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *