दरड आणि भिंती ठरल्या काळ, मुंबईत 25 मृत्युमुखी

राजधानी मुंबई

मुंबई : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये शनिवारी रात्री झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जण, विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सातजण, तर भांडूप भागात भिंत कोसळून 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, जखमींना 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली असून, घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 ते 6 दिवस पावसाचा जोर कायम राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *