शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे अभ्यासक्रम

राजधानी मुंबई

मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध 28 गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच सहा महिने कालावधीचे 156, एक वर्ष कालावधीचे 100 आणि दोन वर्ष कालावधीचे 45 अर्धवेळ (234) व पूर्णवेळ (67) असे एकुण 301 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1 हजार 269 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात.

ही बातमी सुद्धा वाचा :

आठ महिला देश विदेशात गाजवताहेत मसाला निर्मितीचा व्यवसाय…
दरड आणि भिंती ठरल्या काळ, मुंबईत 25 मृत्युमुखी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *