Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणी पूजा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणी पूजा करणार

22

पंढरपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह उद्या मंगळवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करतील. तर, पावसाची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी पंढपूर दौºयावर रवाना होणार असल्याची माहिती आहे.

कोरोना महामारी अद्यापही कायम असल्याने यंदाही काटेकोर नियमांचे पालन करून पंढरपूरच्या वारी पूर्ण करावी लागत आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुणे परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते वाहतूक आणि विमान किंवा हेलिकॉप्टर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे. पावसाची स्थिती लक्षात घेऊनच हा प्रवास निश्चित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापुजेचा मान मंदिरातील विणेकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदूबाई यांना मिळाला आहे. मागील वर्षांपासून वारी भरत नसल्याने महापुजेचा मान विणेकºयांना देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.