Home राजधानी मुंबई दहावीतील भरगच्च यशाने हुरळून जाता कामा नये, अकरावी सीईटी परीक्षेत लागणार कस…

दहावीतील भरगच्च यशाने हुरळून जाता कामा नये, अकरावी सीईटी परीक्षेत लागणार कस…

50

मुंबई : कोरोना महामारीमुळे यंदाच्या दहावी परीक्षेत पहिल्यांदाच ‘अंतर्गत मूल्यमापना’द्वारे लावण्यात आला आहे़ त्यामुळे चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता अकरावी सीईटी [ 11 TH CET ] परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठीची तयारी करावी लागणार आहे.

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्के, 100 टक्के गुण मिळाले. मात्र, इतके गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.

इयत्ता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाºया सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले असून, 21 आॅगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान ही परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. 20 जुलै सकाळी साडेअकरापासून 26 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र आॅनलाईन पद्धतीने भरायचे आहे.