Home राजधानी मुंबई अश्लील चित्रपट बनवला, शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अटक

अश्लील चित्रपट बनवला, शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अटक

23

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शे ट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अश्लील चित्रपट तयार करून प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने ही कडक कारवाई केली आहे. राज कुंद्राविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.