Home राज पाट शेवटी पंजाबातील वादळ शमले, नवज्योतसिंह सिद्धू शांत…

शेवटी पंजाबातील वादळ शमले, नवज्योतसिंह सिद्धू शांत…

47

CONGRESS HO : काँग्रेसने माजी मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची पंजाब प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. पक्षातील अंतर्गत संघर्षानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

नवज्योतसिंह सिद्धू यांच्या निवडीचे काँग्रेसकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेतील. सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर चार कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या माध्यमातून सिद्धू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने यशस्वी केला आहे.