Home BREAKING NEWS TET परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान

TET परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान

71

मुंबई : दोन वर्षानंतर 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षाचे (TET) आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात. गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. TET परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड [ school education minister varsha gaikwad ] यांनी केले आहे.