Home राष्ट्रीय चालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश

चालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश

21

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने चालू शैक्षणिक वर्ष ३१ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच पुढील शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) १ आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश दिले आहेत.

यूजीसीने शैक्षणिक दिनदर्शिका जारी केली असून, त्यात २०२०-२१ च्या सत्र परीक्षा तसेच अंतिम वर्षांच्या परीक्षा ३१ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

सर्व उच्च शिक्षण संस्थांना आॅफलाईन, आॅनलाईन किंवा दोन्हीचा सहभाग असलेल्या संयुक्त पद्धतीने संबंधित परीक्षा घेता येतील़ मात्र, त्यासाठी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यक असेल. १२ वी परीक्षेच्या सर्व अभ्यास मंडळांचे निकाल ३१ आॅगस्ट २०२१ पर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

त्यानंतर २०२१-२२ या नव्या शैक्षणिक वर्षातील पदवी प्रवेश प्रकिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून १ आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करण्याची सूचना यूजीसीने केली आहे.