चीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता

राष्ट्रीय

HEAVY RAIN IN CHINA : चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत केले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे 12 जण मृत्युमुखी पडले आणि बरेचजण अजूनही बेपत्ता आहेत. त्याचबरोबर सखल भागात राहणाºया सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

हेनानच्या प्रांतीय हवामान विभागानुसार, प्रांतीय राजधानी झेंगझो येथे मंगळवारी संध्याकाळी चार ते पाच दरम्यान विक्रमी 201.9 मिमी पाऊस पडला. मंगळवारी झेंगझो शहर केंद्रात 24 तासांत सरासरी 457.5 मिमी पाऊस झाला. हवामान खात्याची नोंद ठेवण्यात आल्यापासून हा दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे.

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

जनजीवन ठप्प
वृत्तानुसार, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरातील रहदारी ठप्प झाली. रस्ते आणि हवाई मार्ग अवरोधित केले आहेत. 800 हून अधिक बससेवा स्थगित कराव्या लागल्या, शंभरहून अधिक मार्ग वळविण्यात आले आणि सब वे सेवाही तात्पुरत्या निलंबित करण्यात आल्या. तसेच, अनेकजण गाड्यात अडकून पडल्याचे वृत्त आहे.

250 उड्डाणे रद्द
घटनास्थळी पोलिस अधिकारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि इतर स्थानिक उपजिल्हा कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. ‘सब वे’ मधील पाणी कमी होत असून प्रवासी सध्या सुरक्षित आहेत. झेंझझौदोंग रेल्वे स्टेशनवर 160 हून अधिक गाड्या थांबविण्यात आल्या. झेंगझो विमानतळावर शहराकडे जाणारी आणि शहरातील 260 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काही गाड्या जागीच थांबवल्या असून, काहींचे मार्ग बदलवण्यात आले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *