नागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू

उपराजधानी नागपूर

नागपूर : हवामान विभागाने विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला असतानाच आज बुधवारी सकाळपासून नागपुरात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यात दोन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, पुणे, साताºयातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांत जलसाठ्यात वाढ झाली असून, अनेकतलावांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. या तलावात दीड लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, बाभुळगांव तालुक्यातील नांदुरा खुर्द येथे शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *