कोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या

राजधानी मुंबई

मुंबई : दोन दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शहरे आणि गावांमध्ये पावसाचा हाहा:कार [ KOKAN RAIN ] सुरू आहे. अनेक घरे बुडाली असून, अनेकजण घरात अडकून पडले आहे. बसस्थानक पूर्णपणे पाण्याखाली आले तर रेल्वेगाड्याही जागीच थांबल्याची माहिती आहे. दरम्यान, लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित येत असल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

कोकणातील वशिष्ठी, शिव नदी [ SHIV RIVER ] आणि जगबुडी नदीला महापूर आल्याने तब्बल पाच हजार नागरिक पाण्यात अडकली आहेत. घरे, वाहने बुडाली असून, भयावह स्थिती उद्भवली आहे. चिपळूणमध्ये घरांमध्ये अडकलल्या नागरिकांना बोटीद्वारे बाहेर काढण्यात येत आहे. चिपळूण पालिकाच्या वतीने क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटरमधील आॅक्सिजनचा पुरवठा बंद झाला असून, रुग्णांचे जीव धोक्यात असल्याची माहिती आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे कोकण रेल्वेच्या एकूण नऊ एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. [ KOKAN RAIWAYS EXPRESS STOPED BY HEAVY RAIN]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *