‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…

उपराजधानी नागपूर

NAGPUR SUB CAPITAL : दीपस्तंभ धर्मदायी संस्थेच्या 121 वृक्षारोपन संकल्प पुर्ती सोहळा जयताळा येथील वैकुंठधाम परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘ वन विश फाॅर दी अर्थ’ [ ON WISH FOR EARTH ] या उपक्रमाची सुरवात मिटकाॅन प्रशिक्षण संस्थेचे विदर्भाचे संयोजक व प्रभारी ज्ञानेश्वर चौधरी तसेच प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी केतकी कानिटकर, ग्राम संरक्षण समिती च्या सचिव वर्षा मानकर कोकाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. ‘ वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ,पक्षीही सुस्वरे आळवीती! ‘ जगदगुरु तुकोबारायांनी वृक्षांचे महत्त्व अत्यंत समर्पक शब्दांत मांडले आहे. मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाचा संदर्भात झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात आहे.
संस्था यापुढे वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांना आवाहनातून आपल्या प्रियजनांच्या आठवणीत कमीतकमी एक वृक्ष लावावे. वाढदिवस, लग्न वर्धापनदिन, महापुरुषांच्या जयंती अशा अनेक शुभ दिनी वृक्षारोपन करण्यास प्रोत्साहित केल्या जाईल. ‘ वन विश फाॅर दी अर्थ ‘ या उपक्रमा अंतर्गत झाडं लावून पर्यावरणाची काळजी घेण्यात प्रत्येकाने आपला वाटा उचलावा अशी विनंती संस्थेचे सचिव नंदकिशोर मानकर यांनी केले. बऱ्याचदा जागे अभावी ईच्छा असुनही वृक्षारोपन करता येत नाही. अशा वेळी आपण संस्थेला वृक्ष उपलब्ध करून दिल्यास आम्ही ते योग्य ठिकाणी लावून जगविणार.
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झटणारे, वृक्ष लावून त्याचे संगोपन करणारे, आपला परिसर ऑक्सिजनी हिरवागार करणारे तसेच निसर्गाची सेवा करण्याऱ्यांना ‘ क्लायमेट वाॅरियर ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौरागडे, सचिव नंदकिशोर मानकर, वरद कोटगिरे विनोद कुमार भेले, धमेंद्र नारनवरे, मंगेश ईरपाची, पराग सुरकर समिती भालेराव,वागेश वर्मा, अमिश भोंग देविदास पांडे, तरुण कुमार धारवैया, आदित्य गांवडे, रोशन शर्मा, नहुष मानकर, श्रदानंद नारनवरे, प्रतिक नाकतोडे, अर्चना रूसेसरी, शिला काहाते, ज्योती शेगोकर विशाखा भेले आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *