Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य पूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …

पूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …

64

पूजा हेगडे ही मुख्यत्वे दक्षिण भाषांतील चित्रटात भूमिका साकारत आहे.
हिंदीतही हाऊसफुल्ल 4 मध्ये तिने अभिनय केला आहे. तिच्या जोडीला अक्षय कुमार, रितेश देशमुख, कृती सेनन अशी मंडळी होती.


पूजाचे कुटुंब कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील असले तरी तिचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. ती हिंदीशिवाय तेलगू, कन्नड़, तामिळ, इंग्रजी भाषेत संवाद साधू शकते. पूजाला कॉलेज दिवसांपासूनच मॉडलिंगमध्ये आवड होती.

 


पूजा 2009 साली मिस फेमिना इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, तिला यश मिळू शकले नाही. 2010 मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आणि दुसरे स्थान (सेकंड रनर अप) मिळवले.

पूजाने तामिळ चित्रपट ‘मुगमोदो’ मध्ये पहिल्यांदा अभिनय केला. जीवा हा तिचा नायक होता. तेलगु फिल्म ‘ओका लैला कोसम’ मध्ये नाग चैतन्य सोबत अभिनय केला. ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांचे पुतणे वरुण तेज सोबतही एका चित्रपटात भूमिका केली आहे. हिंदीमध्ये २०१६ मध्ये ऋतिक रोशनसोबत ‘मोहंजोदडो’ मध्ये काम केले आहे.
(छायाचित्रे साभार)

*****