Home राजधानी मुंबई खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात

खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात

101

मुंबई : राज्यातील खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये [ SCHOOL FEE ] १५ टक्के इतकी कपात करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मागील दीड वर्षांपासून पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च हा पालकांच्या समोर मोठा मुद्दा राहिला आहे. कोरोनातील अडचणींमध्ये आता पालकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाजगी शाळांच्या १५ टक्के शैक्षणिक शुल्क (SCHOOL FEE) कपातीचा अध्यादेश काढण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे समजते.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने खाजगी शाळांनी शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याबाबत हा अध्यादेश काढला जाणार असून, ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हे स्पष्ट होत आहे.

हे सुद्धा वाचा :

पूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …
महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर
राज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री