त्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…

राष्ट्रीय

ELEPHANT DASHED A MAN : शांतपणे रस्ता ओलांडणाºया हत्तींच्या कळपाला दोन्ही बाजूंनी छेडणाºया लोकांना मग सर्वांत मागे असलेल्या हत्तीने सर्वांना पिटाळले़ आणि एकाला चिरडून मारल्याचाही प्रकार समोर आला आहे. ही घटना कुठे घडली याबाबत मात्र समजलेले नाही.

भारतीय वन सेवेतील अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर टाकलेल्या व्हिडीओतून, हत्ती, हत्तीणी आणि त्यांच्या पिलांचा कळप एक रस्ता पार करत असतो. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 100 जण रस्त्यावर उभे असतात. काहीजण हाता चपला आपटून आणि आरडाओरड करत असतात. यात मुलांचा अधिक भरणा दिसून येतो़ ही मंडळी निघून गेल्यानंतर एक मोठा हत्ती मुलांकडे कटाक्ष टाकत मोठ्या गर्दीकडे धाव घेतो. सर्वजण पळतात;परंतु एक व्यक्ती धावताना पळतो आणि शेताच्या कुंपणाकडे धाव घेतो़ मग काय हत्ती त्याच्यामागे धावत जाऊन पायाने चिरडतो. वन्यप्राणी कधीही कुणावर आपणहून हल्ला करत नाही. मनुष्यच त्याला डिवचत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *