वन्यजीव संवर्धनासाठी घेता येणार वन्यप्राण्यांना दत्तक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

रानशिवार

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली [ sanjay gandhi national park safari ] येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षासाठी आहे. वाघ रुपये ३ लाख १० हजार , सिंह रुपये ३ लाख, बिबट रुपये १ लाख २० हजार, वाघाटी रुपये ५० हजार , नीलगाय रुपये ३० हजार, चितळ रुपये २० हजार , भेकर रुपये १० हजार .

अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरीता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा. वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई

ई मेल : lionsafaripark@gmail.com भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *