Home रानशिवार हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांना विशेष दूरध्वनी मदत

हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांना विशेष दूरध्वनी मदत

68

राजधानी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांना विशेष दूरध्वनी मदत क्रमांकाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

तातडीच्या आणि बिनतातडीच्या प्रकरणातही २४ तास ७८२ ७१७ ०१ ७० या क्रमांकाची सेवा उपलब्ध राहील. संकटकाळी आयोग आणि सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे स्मृती इराणी म्हणाल्या. हा विशेष मदत क्रमांक उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचे अभिनंदन केले.

देशभरातील महिलांना पोलिस, रुग्णालय, कायदाविषयक मार्गदर्शन तसेच मानसशास्त्रीय समुपदेशन अहोरात्र उपलब्ध राहावे, याकरता या क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत, 700 कोटी रुपये मंजूर
शिक्षण अर्धवट आहे, मग काळजी नको़ राज्य सरकारचा कौशल्य विभाग तुमच्या मदतीला…