Home राजधानी मुंबई मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

34

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रतील पूरग्रस्तांसाठी मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू घेऊन ९ ट्रक रवाना करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यातील चार वाहनांना मुंबईतून हिरवा झेंडा दाखवला.

पूरग्रस्तांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, कपडे, बिस्किटचे बॉक्स, ब्लँकेट्स, चटई, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्यांची मदत पूरग्रस्त भागात पाठवण्यात आली. आवश्यकतेनुसार रोज मदतीचे ट्रक पूरग्रस्त भागात पाठवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.