Home राष्ट्रीय बँक बुडाली तर तीन महिन्यांत पैसे मिळणार

बँक बुडाली तर तीन महिन्यांत पैसे मिळणार

115

नवी दिल्ली :  बँक बंद झाल्यानंतर बुडीत निघालेल्या बँकेच्या खातेधारकांना तीन महिन्यांत [90 दिवस ]  पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठेवीदारांला पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट

अर्थमंत्री निर्माला सीतारमण [ NIRMALA SEETARAMAN ] म्हणाल्या, मोदी सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन बिल 2021 ला बैठकीत [ UNION CABINATE MEETING ] मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे  विम्याची मर्यादा वाढेल आणि त्याअंतर्गत 98.3 टक्के बँक खातेधारक संरक्षित होतील. हा निर्णय सर्व बँकासाठी लागू करण्यात आला आहे.