TAPORI TURAKI : बायकोचा राग आला तर तो गिळा…

टपोरी टुरकी ....Jocks for You
झम्प्या टी.व्ही.च्या दुकानात गेला…दुकानदाराशी विचारपूस सुरू…

हा टी.व्ही. कितीचा भाऊ ?
टी.व्ही.वाला बोलला, ५५ हजार रुपये!
ब्बाप रे ! खूप महाग आहे.

बरं मग, काय खास आहे ह्या टी.व्ही.त ?
लाईट गेली की आॅटोमॅटिक बंद होऊन जातो.
ब्बाप रे! मग करा पॅक.

***

इंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा…

कुछ कुछ होता है : कसंतरी होतंय

हॉलो मॅन : पोकळ माणूस

डाय अनादर डे : नंतर कधीतरी मर

गॉन विथ द विंड : गेला उडत

सुपरमॅन : लई भारी माणूस

स्कॉरपियन किंग : तात्या विंचू

द मम्मी रिटर्न्स : आई परत आली

मिशन इम्पॉसिबल : नाही जमत

मिशन इम्पॉसिबल टू : एकदा सांगितलं ना नाही जमत!

***

दिनू : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये…
दिनू (थोडा विचार करून) :आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर…?

***

भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना!
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे. ९५ रुपये सुटे आहेत का?
भिकारी : हो आहे, साहेब
पुणेकर : मग आधी ते खर्च कर.

***

आजचा सुविचार
बायकोचा राग आला तर तो गिळा…
नाहीतर गिळायला मिळणार नाही!

***

छावीचं संजयशी भांडण चालू असतं…
संजय : तू स्वत:ला आवर नाही तर,
छावी : नाही तर क्काय
संजय : माझ्यातला जनावर बाहेर येईल.
छावी : हा हा येऊ देत, उंदराला कोण घाबरतंय.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *