Home आंतरराष्ट्रीय बातम्या निम्म्या देशाने लस घेतल्यानंतरही अमेरिकेत एका दिवसात आढळले लाखाहून अधिक रुग्ण

निम्म्या देशाने लस घेतल्यानंतरही अमेरिकेत एका दिवसात आढळले लाखाहून अधिक रुग्ण

78

वॉशिंग्टन : मुखावरण [ मास्क] सक्ती मागे घेऊन दोन महिने होत नाहीत तोच अमेरिकेत एका दिवसात लाखावर नवीन रुग्ण सापडल्याने पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुखावरण वापरणं, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. त्यानंतर लस घेतली की माणूस अधिक सुरक्षित राहतो. अनेक देशांत लसीकरण प्रमाणात झाल्यानंतर मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात आली होती; पण काही देशांमध्ये लसीकरणानंतरही मुखावरण वापरण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे.

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस,अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्क सक्ती नाही असं जाहीर करण्यात आले होतं. मात्र, आता अमेरिकेत पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत एक लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जवळपास अर्ध्या लोकसंख्येचे लसीकरण [ vaccination]  पूर्ण होऊनही ही परिस्थिती असल्याचे पाहून सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने लसीकरण झालेल्या लोकांनाही मुखावरण वापरण्याचे आवाहन केले आहे.