… आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी मारला पोलिस कर्मचाऱ्याला सॅल्यूट, सन्मानपूर्वक निरोप 

अमरावती

अमरावती : पोलिस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत  असतो. मात्र, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किंन्हाके यांना सॅल्युट करत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलिस दलात रुजू झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी काल शनिवारी औक्षण करून तसेच शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव श्रीमती ठाकूर यांनी केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना ठाकूर यांनी सॅल्यूट केला. तसेच, त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्टपासून सुरू होणार
TAPORI TURAKI : बायकोचा राग आला तर तो गिळा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *