कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा तातडीने सुरू व्हाव्यात : युनिसेफ

शिक्षण

जिनेव्हा : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजे, असे युनिसेफचे [ UNISEF ] प्रवक्ता जेम्स एल्डर यांनी म्हटले आहे. ते जिनेव्हा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शाळा बंद असल्यामुळे जगभरात ६० कोटी मुलांचे शैक्षणिक [ SCHOOL EDUCATION ]  भवितव्य अंधारात असल्यामुळे शाळा सुरू करणे श्रेयस्कर आहे. शाळेतील सुरक्षा, मैत्री आणि अन्नवाटपाची संस्कृती सध्या अस्वस्थता, हिंसा आणि युवती गरोदरपणा यात बदललेली दिसत आहे, असेही जेम्स एल्डर म्हणाले.

शाळांच्या आधी बार आणि पब सुरू होणे ही मोठी चूक आहे. सगळ्या शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण होईपर्यंत शाळा बंद ठेवू शकत नाही. त्यामुळे सरकारांनी शैक्षणिक आर्थिक तरतुदी कायम ठेवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे नव्या स्वप्नपूर्ती
आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्टपासून सुरू होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *