16 कोटी रुपयांची लस दिलेल्या वेदिकाचा लढा संपला…

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : पिंपरी चिंचवड येथील चिमुरडी वेदिका शिंदे [ vedika shinde ] हिला तब्बल 16 कोटी रुपयांची दुर्धर आजारावरील ‘झोलगेन्स्मा’ ही लस दिल्यानंतर मृत्यसोबतची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. वेदिकाला स्पायनल मस्कुलर एॅट्रॉफी हा आजार झाला होता.

मागील फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरात नैसर्गिक हालचाली होत नसल्याचे दिसून आले होते. तिच्या आईवडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचे समोर आले. यानंतर वेदिकाच्या कुटुंबियांनी लोकसहभागातून पैसा उभारण्यासाठी आवाहन केले होते. देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून ‘झोलगेन्स्मा’ लस आयात करण्यात यश आले. मागील 15 जूनला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होण्याची प्रतीक्षा असतानाच काल रविवारी मात्र तिचे निधन झाले़ त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *