Home रानशिवार ‘सैराट’मधली प्रेरणा आठवतेयं…

‘सैराट’मधली प्रेरणा आठवतेयं…

73

अखिल भारतीय मराठी चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे ‘सैराट’. या चित्रपटातून अचानक समोर येत रात्रीतून स्टार बनलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू. परंतु तिचे मूळ नाव प्रेरणा महादेव राजगुरू असे आहे़ ती सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहे.

‘सैराट’ नंतर रिंकूने हिंदी चित्रपटांतही भूमिका केल्या़ शिवाय डिजिटल विश्वात (वेब सीरिज) देखील पदार्पण केले. ‘सैराट’ मधील दमदार अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. यानंतर तिने कागर, मेकअप,मनसुमल्लिगे या चित्रपटात भूमिका साकारल्या. रिंकूने पहिल्यांदाच ‘हंड्रेड’ या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे.

विशेष म्हणजे रिंकू राजगुरू लवकरच ‘झुंड’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले असून, चित्रपटाचे छायाचित्रण नागपुरात करण्यात आले आहे.

 


मागील काही दिवसांपासून असे दिसून येते, की रिंकूने विचारपूर्वक चित्रपटांची निवड केली आहे. हातीशी जे काही चित्रपट आले, त्यातून तिने बरेच काही शिकण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिने आपला अभिनय अमिताभ बच्चन यांच्या समोरही सादर केला आहे. आता ती थेट ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या समोर ‘२०० हल्ला हो’ या महिलाप्रधान चित्रपटातून पुढे येत आहे. ‘जी 5’ ने त्याची निर्मिती केली आहे.
विशेष म्हणजे हा चित्रपट नागपुरात 2004 मध्ये घडलेल्या अक्कू यादव प्रकरणावर आधारित असल्याचे समजते. स्वाती मेहता यांनी याच घटनेवर ‘किलिंग जस्टिस- व्हिजिलांटिझ्म इन नागपूर’ अशा आशयाचे पुस्तक लिखाण केले होते.

(रिंकू राजगुरू : छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम)