मलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी नागपूर महानगरपालिकाकडे नवी अभियांत्रिकी यंत्रणा…

उपराजधानी नागपूर

नागपूर : शहरातील मलवाहिन्यांमध्ये होणारे चोकेज काढण्याचे काम नागपूर महानगरपालिकेचे आहे. जेथे चोक होते त्या ठिकाणी मलवाहिनी फुटली असल्याचे सांगून मनपाचे माध्यमातून नवी मलवाहिनी टाकण्याचे कार्य केले जाते. विनाकारण यामुळे खर्च वाढतो. गेल्या दहा वर्षांत हे प्रकार खूप वाढले आहेत. मात्र आपल्याजवळ आता नवीन तंत्रज्ञान आहे. चोकेज शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी याचा आधार घ्या, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका [ Nagpur Municiple Corpaoration ] , आयवेज स्किल इंडिया व ऑफ्सवर्ल्ड बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आरोग्य विभागातील स्वच्छता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील ‘या’ ठिकाणी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत निर्बंधात सवलत

उद्‌घाटनपर भाषणात पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, आता प्रत्येक क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले आहे. जमिनीवरून मशीन फिरविली तरी चोकेज कुठे आहे, याची माहिती मिळते. मशीनच्याच साहाय्याने चोकेज काढता येतात. ज्या ठिकाणी मोठे वाहन जाऊ शकत नाही, अशा लहान गल्ल्यांमध्येही मशीनचा उपयोग चोकेज काढण्यासाठी करण्यात येतो. सिल्वर क्लिनिंग तंत्रज्ञानावर आधारीत मशीनचे प्रशिक्षण आता कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे यापुढे मलवाहिनी बदला, असे बेजबाबदार उत्तर देता येणार नाही, असेही ते म्हणाले. नागपुरात इंग्रजकालिन ट्रंक लाईन आहे. मात्र, त्याचा मेंटेंनन्स आता जिकरीचंच काम आहे. त्यावर जर कोणाकडे उपाययोजना असेल तर त्याही पुढे आणा, असे आवाहन महापौरांनी केले.

कंपनीचे कंट्रीहेड मनोज सिंह यांनी चोकेज काढण्यासाठी उपयोगात येणाऱ्या मशीन्सची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. त्याचा फायदा काय, कशाप्रकारे त्याचा उपयोग करावा, नागरिकांच्या आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनेही ते कसे फायद्याचे आहे, याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. ही मशीन चालविण्यासाठी विशेष प्रशिक्षणसुद्धा ऑपरेटर्सला देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अन्य बाबींवरही यावेळी माहिती देण्यात आली.

कार्यशाळेला उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य सभापती संजय महाजन, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, आयवेज स्किल इंडियाचे कंट्री हेड मनोज सिंह, आफ्सवर्ल्डचे मुख्य समन्वयक ए.एम. खडक्कार, शशिकांत मानापुरे, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, दहाही झोनचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

‘सैराट’मधली प्रेरणा आठवतेयं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *