Home उपराजधानी नागपूर नागपूर मनपा केन्द्रावर बुधवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर मनपा केन्द्रावर बुधवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

27
file photo

नागपूर : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रावर बुधवारी (४ ऑगस्ट ) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध राहील.