विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही, उच्च न्यायालयाची विचारणा

शिक्षण

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात फक्त दिव्यांग, विशेष विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्रू सरकारला केली आहे.

नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हा प्रश्न सरकारला विचारला आहे.

चित्रपटांच्या शेकडो वाहिन्या असताना शिक्षणासाठी एखादी २४ तास चालणारी वाहिनी का नाही? लोकसभा आणि राज्यसभाच्या कामकाजांविषयी स्वतंत्र दूरचित्रवाहिनी आहे, तशीच शिक्षणासाठीही असायला हवी. याचा केंद्र आणि राज्य सरकारांनी विचार करावा अशी सूचना करत मोबाईल नेटवर्क न मिळण्याची समस्या ही कायमच राहणारी असून राज्यातील सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत दूरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून शिक्षण पोचवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. त्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. अशी सूचनाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. दरम्यान, यासंबंधी सुनावणी येत्या गुरुवारी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *