Home उपराजधानी नागपूर नागपुरात गुरुवारी कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

नागपुरात गुरुवारी कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

37

नागपूर : राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रांवर गुरुवारी ५ आगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड [ COVISHIELD VACCINE ] लस नि:शुल्क दिली जाईल.

लसीकरणसाठी आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.
१८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे.