Home प्रादेशिक विदर्भ शेगाव संस्थानचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन

शेगाव संस्थानचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन

57
शेगाव :  श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील [ shivshankar bhau patil ] यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे निधन झाले आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावात भक्तांनी येऊ नये, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कर्मयोगी काळाने हिरावून नेला : मुख्यमंत्री
मुंबई : शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्तव्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोक संदेशात म्हणतातश्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञानभक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचितांची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील असे पण सत्य आहेत. श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजनव्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

मानवसेवेचा डोंगर उभा : उपमुख्यमंत्री अजित पवार

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानं मानवसेवेला वाहून घेतलेले सेवेकरी निर्माण करणारं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं आहे. एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी, अध्यात्माच्या माध्यमातून मानवसेवेचा डोंगर उभा करणारं महान व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. शेगाव संस्थानचा चेहरामोहरा बदलणाऱ्या शिवशंकर भाऊंचं व्यवस्थापन कौशल्य जगात सर्वोत्कृष्ट होतं. शेगाव संस्थानच्या माध्यमातून त्यांनी उभारलेली यंत्रणा, केलेलं काम जगभरातल्या युवकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मयोगी शिवशंकर भाऊंच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.