पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद

उपराजधानी नागपूर

नागपूर : लोकांच्या हातांना रोजगार देणे हे आपले पहिले प्राधान्य असून आरोग्य आणि रोजगार यावर अधिक भर देण्यात येत आहे. तसेच देश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचासुद्धा आनंद घेता येईल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार [ Vijay Vadettiwar ] यांनी व्यक्त केला.

रेशीम संचालनालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील टसर रेशीम पर्यटन विकास केंद्र आगरझरी येथे नुकताच भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद, क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, सहाय्यक संचालक श्री. ढवळे यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने उभा राहत असलेल्या रेशीम प्रकल्पाच्या कार्याला कोठेही अडथळा येणार नाही, असे सांगत श्री. वडेट्टीवार म्हणाले, या प्रकल्पाला भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देत भव्य असा प्रकल्प याठिकाणी साकारल्या जाईल. तसेच टसर रेशीम प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार प्राप्त होईल. श्री. वडेट्टीवार म्हणाले, की एखाद्या अधिकाऱ्यांमध्ये काही करायची धडपड असेल तर त्या कार्याला मूर्तरूप ते देऊ शकतात. पूर्वी आरमोरी आणि पाथरी या ठिकाणी रेशीमचे उत्पादन व्हायचे व या ठिकाणी विक्री केंद्रे सुद्धा होती. रेशीमच्या कापडाला बाजारात आजही मोठी मागणी असून रेशीमच्या कापडाची वेगळीच ख्याती आहे. त्यावेळी मच्छिमार बांधवांना मच्छिमारीसोबतच दुसरा व्यवसाय म्हणजेच रेशीम व्यवसाय होता. आज पैठणी साडी तसेच लेनीन कापड यामध्येसुद्धा रेशीमचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यामुळे देश-विदेशातून येणारे पर्यटक या प्रकल्पाला भेट देतील. येथे येणाऱ्या पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटन अनुभवास मिळेल.

जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, की स्थानिकांना रोजगार देणारा हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहत आहे. त्यामुळे निश्चितच या गावातील स्थानिक नागरिकांना या माध्यमातून रोजगार तर मिळेलच पण त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही मदत होईल. ताडोबा मध्ये देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. ताडोबा सोबतच टसर सिल्क या प्रकल्पाच्या माध्यमातून टसर पर्यटन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

बालविवाह रोखणार, जनजागृतीसाठी सप्टेंबरपर्यंत राज्यव्यापी मोहीम

श्रीमती बानायत म्हणाल्या, की पूर्व विदर्भातील करवती रेशीम साडीला जीआय टॅगिंग मिळाले आहे.  ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक येतात त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्याचा विचार होता. वनविभागाच्या मदतीने एक एकराची जमीन या प्रकल्पास उपलब्ध झाली आहे. येथील प्रशासनामुळे व त्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास येईल. हा प्रकल्प म्हणजे पर्यटन आणि रेशीम यांच्या समन्वयातून निर्माण होणारा प्रकल्प आहे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना रेशीम प्रक्रिया आणि त्यातून माल कसा उत्पादित केला जातो याबाबत प्रत्यक्ष बघता येणार आहे. तसेच उत्पादकांना छोटे स्टॉल याठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तेथे ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहतील. गावातील स्थानिक नागरिकांना व बचत गटांना सदर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्य लॉटरीची महाराष्ट्र गणेशलक्ष्मी रक्षा बंधन मासिक सोडतीची बक्षिसरचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *