Home राजधानी मुंबई …म्हणून तोपर्यंत कोरोना निर्बंध कायम ठेवण्याची शिफारस

…म्हणून तोपर्यंत कोरोना निर्बंध कायम ठेवण्याची शिफारस

75
file photo

मुंबई : महाराष्ट्रात सुमारे 70 टक्के लोकांचे लसीकरण [ corona vaccination ] होत नाही, तोपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याची शिफारस राज्य कृती दलाने केली आहे.

राज्यातील 11 जिल्ह्यात कोरोनाविषयक तिसºया स्तरावरील निर्बंध कायम आहेत, त्या सर्व जिल्ह्यांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पालघर, बीड आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील लसींच्या दोन्ही मात्र घेऊन संपूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या 16 टक्क्यांहून अधिक नाही, तर लसीची पहिली मात्रा घेणाºयांचे प्रमाणही 30 टक्क््यांच्या आसपास असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाविषयक राज्यस्तरीय कृती पथकाने त्याबद्दल चिंता व्यक्त केली असून जोपर्यंत संपूर्ण लसीकरण होणाºयांचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत येत नाही तोपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याची शिफारस पथकाने केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बजावले

मुंबई आणि ठाण्यातही सर्वसाधारणपणे अशीच परिस्थिती असल्याचेही कृती पथकाने नमूद केले असून, ही आकडेवारी केंद्र सरकारच्या अधिकृत कोविन अँपवरूनच मिळाली असल्याचेही स्पष्ट केले आहे. अपुºया लसीकरणाची कारणे काहीही असली तरी लसीकरणाचा वेग वाढत नाही तोपर्यंत निर्बंध शिथिल करणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा कृती पथकाने दिला आहे.

‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी