राधा-कृष्णाच्या भक्तीत रंगलेल्या राखी गुप्ता

अनुपमा... महिला विश्व

प्रेमाला बंधन नाही, जात नाही पात नाही, वयाची सीमा नाही, लिंगभेद नाही़ म्हणूनच राधा-कृष्णा आबालवृद्धांमध्ये पूजनिय आहे,श्रद्धेय आहे. अशातून मग भावना व्यक्त होतात, गीत जन्माला येतं, संगीत जन्माला येतं आणि मग त्या आराध्याचं गुणगान करण्यास वय विसरून जातो, आपलं स्थान विसरून जातो.

अशाच राधा आणि कृष्ण यांच्या लीलाचं गायन केलं आहे, एका महिला अधिकाºयांनी़ राखी गुप्ता असे त्यांचे नाव त्या आयएएस अधिकारी आहेत. राधा आणि कृष्ण यांची आपण एकत्र पूजा करतो. त्यांना एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. गाण्यातून आपण आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, असे त्या सांगतात.

कृष्णाच्या बाललीला हा आपला आवडता प्रकार असून, प्रत्येक लहान मुलासोबत खेळताना त्यात आपल्याला कृष्णाचेच भाव दिसत असल्याचे राखी आवर्जून कथन करतात. याच महिन्यात आलेल्या श्रीकृष्ण जन्मसोहळ्याचे निमित्त साधत त्यांनी एक अल्बम प्रकाशित केला आहे. वृंदावन, इस्कॉन टेम्पल अशा वेगवेगळ्या नयनरम्य ठिकाणी छायाचित्र करण्यात आले आहे.

राखी गुप्ता सन 1997 मधील तुकडीतील सनदी अधिकारी असून यापूर्वीही त्यांच्या गाण्याचा अल्बम प्रकाशित झाला आहे. सध्या त्या पंजाबच्या निवासी आयुक्त म्हणून राजधानी दिल्लीत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ‘स्त्री शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. आपल्या प्रशासकीय कामांसोबत त्यांनी गायनाचा छंददेखील जोपासला आहे, हे विशेष.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *