भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने पटकावले सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय बातम्या
  • आॅलिम्पिकचा शेवट चकाकलेला

TOKYO OLYMPIC 2021:  टोकयो आॅलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक हस्तगत केले आहे. नीरज चोप्रा [ Neeraj Chopra ] याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली़ दुसºया थ्रोमध्ये तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

विशेष म्हणजे फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरजच्या जवळपासही आला नाही. नीरजचा एकट्याचा थ्रो 87 मीटरच्या पुढे गेला. चेक रिपब्लिकच्या जाकूबचा थ्रो 86.67 मीटर आणि वितेस्लाव वेसलीचा थ्रो 85.44 मीटरपर्यंत पोहोचला़ त्यामुळे त्यांना अनुक्रमे सौप्य आणि कास्य पदक मिळाले.

बीसीसीआयकडून बक्षिसांची खैरात
मुंबई : बीसीसीआयने [ BCCI ] शनिवारी टोकयो आॅलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावणाºया नीरज चोप्राला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. नीरजने स्पर्धेच्या फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

याशिवाय बीसीसीआयकडून रौप्यपदक मिळवणाºया मीराबाई चानू आणि पैलवान रवी दहिया यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये मिळतील. पैलवान बजरंग पुनिया, बॉक्सर लवलीना बोरगोहन आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय भारताच्या पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावल्याने त्यांना 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *