Home पूर्व विदर्भ भंडारा जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी 34 कोटी मंजूर, जिल्हा कोरोनामुक्त झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या...

भंडारा जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी 34 कोटी मंजूर, जिल्हा कोरोनामुक्त झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव

37
BHANDARA JILHA NIYOJAN SAMITI

भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव आमदार अभिजित वंजारी यांनी मांडला. या प्रस्तावाला सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले. जिल्ह्यातील अधिकारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा जिल्हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरला. याबद्दल सभागृहाने अभिनंदन केले.

भंडारा : भंडारा जिल्हा कोरोनामुक्त [ CORONA FREE BHABDARA DISTRICT ] झाला असला तरी दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य तज्ञाची समिती तयार करून या समितीच्या सल्ल्यानुसार आरोग्य सुविधा वाढविण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. आरोग्य सुविधांचे क्षमता वर्धन करण्यासाठी आज जिल्हा नियोजन समितीने 34 कोटी 24 लाख रुपये निधीला मान्यता दिली आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. यापुढील काळातही जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनात जिल्हा नियोजन समितीचा अत्यंत महत्वाचा वाटा असून विकासाचे नियोजन करतांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच विकास कामे व निधी खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, आमदार नाना पटोले, आमदार नागो गाणार, डॉ. परिणय फुके, ॲड. अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे सिनेमा आणि करमणूक केंद्र उभारणार

सर्वसाधारण योजनेकरिता सन 2020-21 अंतर्गत एकुण मंजुर निवतव्यय रुपये 12914.00 लक्ष असून यापैकी माहे मार्च, 2021 पर्यंत मंजूर असलेला संपूर्ण नियतव्यय रुपये 12914.00 लक्ष संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर शासनाकडून प्राप्त झालेला आहे. त्यापैकी रुपये 12882.03 लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून कार्यवाही यंत्रणांनी माहे मार्च, 2021 अखेर रुपये 12445.43 लक्ष खर्च नोंदविलेला आहे. वितरीत तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 96.61 एवढी आहे.

अनुसुचित जाती उपयोजनेकरिता सन 2020-21 अंतर्गत एकुण मंजुर नियतव्यय रुपये 5056.00 लक्ष असून माहे मार्च,2021 पर्यंत सदर संपुर्ण निधी रुपये 5056.00 लक्ष शासनाकडून प्राप्त झालेला आहे. यापैकी रुपये 5050.48 लक्ष निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला असून कार्यवाही यंत्रणांनी माहे मार्च, 2021 अखेर रुपये 5050.47 लक्ष खर्च नोंदविलेला आहे. वितरीत तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 99.89 टक्के एवढी आहे.

दिव्यांग सर्व्हेक्षणाचा ‘अकोला पॅटर्न’ देशाला दिशादर्शक ठरावा : बच्चू कडू