नागपुरात बुधवारी ९ केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन उपलब्ध

उपराजधानी नागपूर

नागपूर : नागपुरात ९ महानगरपालिका तसेच शासकीय केंद्रावर बुधवारी (११ आॅगस्ट) रोजी कोविशील्ड लस उपलब्ध राहणार नाही. मात्र, कोव्हॅक्सिनसाठी निर्धारित असलेल्या ९ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहील.

कोव्हॅक्सिन उपलब्ध असलेल्या केंद्रांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कामठी रोड व स्व. प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय पाचपावली, प्रगती हॉल दिघोरी आणि आयुष रुग्णालय सदर यांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर १८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोज नागरिकांना घेता येईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *