Home राष्ट्रीय देशभरातील 1 कोटी महिलांना मोफत गॅस मिळणार

देशभरातील 1 कोटी महिलांना मोफत गॅस मिळणार

50
नवी दिल्ली : केंद्र सरकारने उज्ज्वला 2.0 योजना [ UJJVALA 2.0 ] अंतर्गत देशभरातील सुमारे 1 कोटी महिलांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून योजनेचे लाँचिंग करण्यात आले. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील 1 हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा उपस्थित होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशसह अन्य राज्याची विधानसभा निवडणूक पुढील पाच ते सहा महिन्यांत होणार असल्याने या राज्यातून योजनेचा शुभारंभ करण्यात आल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
यासाठी काही नियमांत बसणे गरजेचे आहे. जसे,
– आपले नाव आणि पत्ता एवढ्या तपशीलासह या गॅस योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे.                                                                                                                        -अर्जदार ही महिला असणे बंधनकारक
– महिलेचं वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे
– महिलेकडं बीपीएल कार्ड किंवा रेशन कार्ड असावेच
– अर्जदार महिलेच्या कुटुंबातील इतर कुणाच्याही नावे एलपीजी कनेक्शन नसावे
सदर योजनेसाठी  pmuy.gov.in/ujjwala2.html या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.