राज्यातील 17 तारखेपासून सुरू होणार, शिक्षण विभागाची घोषणा

शिक्षण
मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्य सरकारने कोरोनासंंबंधी निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. अशातच आता यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळा येत्या स्वातंत्र्यदिनानंतर 17 तारखेपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली असल्याने परिस्थिती सुधारत आहे़ शिवाय बाजारपेठाही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी काही प्रमाणात शाळा सुरू कराव्यात असा विचार शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला. त्यानंतर आता ग्रामीण आणि शहरी भागात 17 तारखेपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात 5 ते 8 वी आणि शहरी भागात 8 ते 12 वी शाळा सुरू केल्या जाणार आहे.मात्र, शाळा व्यवस्थापनाच्या कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यांना कोरोना लागण झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करण्यात येणार आहे. शाळा सुरू करताना कोरोना नियंत्रण उपाययोजना करणे, हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करणे, शिक्षकांनी लसीकरण पूर्ण करणे, शिक्षकांनी शाळा असलेल्या गावात राहावे, अथवा ये जा करण्यासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करू नये, असे नियमही घालून दिले आहे.
शासनाने आखून दिलेले अन्य काही नियम :
-शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळला नसावा
-शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले असावे
– पालकांना गर्दी करण्यासाठी शाळा परिसरात प्रवेश देता कामा नये
-विद्यार्थी बाधित झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करावी
-शाळा निजंर्तुकीकरण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी
-बाधित विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे आणि उपचार सुरू करावेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *