Home राजधानी मुंबई राज्यात शाळा सुरू होणार नाही, राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती

राज्यात शाळा सुरू होणार नाही, राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती

33

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने येत्या 17 आॅगस्टपासून शाळा करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या संदर्भात ‘टास्क फोर्स’ शाळा सुरू न करण्याची सूचना दिली होती.  (Maharashtra State Government stay on school reopen from 17 August 2021)

सूत्रांनुसार, मंत्रिमंडळ बैठकीत ‘कोरोना टास्क फोर्स’च्या सूचनांवरून शाळाबाबतचा निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रशासनासोबतच्या बैठकीत ‘टास्क फोर्स’च्या सदस्यांनी शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असा सल्ला देत शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला. त्यामुळे सरकारने पुढील आठवड्यात शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्य सरकारने कोरोनासंंबंधी निर्बंध शिथिल करत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळा येत्या स्वातंत्र्यदिनानंतर 17 तारखेपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली होती.

दरम्यान, काल बुधवारी रात्री मुख्य सचिव, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सची याबाबत बैठक पार पडली. यावेळी शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.